सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ करमाळा शहर व तालुका कडकडीत बंद..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच धनंजय मुंडेंना मुख्य सूत्रधार करुन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाने आज (ता.६) करमाळा शहर व तालुक्यातील गावांना बंदची हाक दिली होती, त्या हाकेला प्रतिसाद म्हणून करमाळा शहर व तालुक्यातील अनेक गावांनी १००% बंद पाळला होता. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकल मराठा समाजाच्या युवकांनी या बंदचे निवेदन तहसील कार्यालयात दिले होते, सध्या इयत्ता दहावीचे पेपर सुरू असल्याने एस. टी. सुविधा तसेच अत्यावश्यक मेडिकल सुविधा सुरू होत्या. दिलेल्या निवेदनात मस्साजोग घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना मुख्य सूत्रधार आरोपी करण्यात यावे, आरोपींना भर चौकात फाशीची द्यावी, हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, ज्यांना हे व्हिडिओ पाठवले, त्या सर्वांना आरोपी करावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. कोणासही पाठीशी न घालता शासनाने या सर्व मागण्या पूर्ण करण्याची जोरदार मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे, त्या मागणीला प्रतिसाद देत करमाळा शहरातील व्यापारी तसेच छोटे मोठे दुकानदारांनी आपले दुकान आज बंद ठेवले होते. तसेच करमाळा तालुक्यातील मोठी गावे केम, जेउर, कोर्टि, कंदर, केतुर, जातेगाव आदी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
- देशमुख खून प्रकरणातील आरोपींना फाशीच्या मागणीसाठी केम येथे कडकडीत बंद
- जेऊर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला





