करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करणार – नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत -

करमाळा शहराचा सर्वांगीण विकास करणार – नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.३० : शहरासमोर सध्या अनेक समस्या उभ्या आहेत. या सर्व समस्या सोडवून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही सर्वार्थाने परिपूर्ण मेहनत घेऊन काम करू व करमाळा शहराचे स्वरूप पालटू, असे आश्वासन नूतन नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत यांनी दिले.

करमाळा अर्बन बँकेच्या वतीने  बँकेच्या सभागृहात नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश बापू शिंगडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम सुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ॲड. बाबुराव हिरडे हे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष सौ. सावंत म्हणाल्या की, करमाळा शहरातील नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण कामाला लागलो आहोत. आता आमच्यात कोणतेही मतभेद न ठेवता केवळ विकास हाच एकमेव उद्देश समोर ठेवून काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नूतन नगरसेवक संजय सावंत यांनीही शहरवासीयांचे आभार मानले. करमाळा अर्बन बँकेने आयोजित केलेला हा सत्कार आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, इतक्या मोठ्या मानाने केलेल्या स्वागताबद्दल त्यांनी बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांचे आभार मानले. आगामी काळात शहर विकासाच्या कामांसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे डॉ. ॲड. बाबुराव हिरडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, करमाळा नगरपरिषद ही १५८ वर्षांची जुनी नगरपालिका असून तिचा इतिहास गौरवशाली आहे. मात्र, सध्या शहराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांसमोर मोठे आव्हान उभे आहे. हे आव्हान पेलण्यासाठी कोणत्याही मोहाला किंवा लोभाला बळी न पडता केवळ शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे व मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यानी यांनी केले. त्यांनी सांगितले की, निवडणुकीत नागरिकांनी दिलेला कौल आम्ही स्वीकारत असून, नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचे स्वागत करण्याचे धोरण बँकेने पूर्वीच ठरवले होते. आज त्याला मूर्त स्वरूप आले आहे. शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी एकविचाराने काम करावे, यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन त्यांनी दिले.
उपस्थितांचे स्वागत करमाळा अर्बन बँकेचे उपाध्यक्ष गोरख अण्णा जाधव संचालक यशराज दोशी, चंद्रकांत चुंबळकर,ॲड. सोनु घोलप  माजी उपाध्यक्ष विजय दोशी,  मकजी नगरसेवक प्रवीण जाधव, तसेच कलीम काझी, कुलकर्णी मॅडम आदींनी केले.
या कार्यक्रमात नगराध्यक्ष मोहिनीताई सावंत , संजय सावंत, स्वाती फंड, चित्राली सावंत, लता घोलप, सचिन घोलप, दीपक चव्हाण, अतुल फंड, संदीप कांबळे, विठ्ठल आप्पा सावंत, मुलाणी भाभी, गुगळे भाभी, सुनीता ढाणे,निर्मला गायकवाड, इंदलकर ताई, सचिन गायकवाड ,पिंटू इंदुलकर, सुनील लुनिया यांचे सत्कार करण्यात , गोपाळ वाघमारे यांच्यासह नूतन नगरसेवक दीपक चव्हाण यांचीही भाषणे झाली. यावेळी करमाळा अर्बन बँकेने काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश क्षीरसागर यांनी केले.कार्यक्रमास करमाळा अर्बन बँकेचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!