करमाळा पंचायत समिती व जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण जाहीर; महिला उमेदवारांना मोठी संधी

करमाळा दि.13, करमाळा पंचायत समितीच्या २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आणि सर्वसाधारण गटासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

 गणानुसार आरक्षण पुढीलप्रमाणे आहे :
१. रावगाव – (SC) अनुसूचित जाती महिला
२. पांडे – (SC) अनुसूचित जाती सर्वसाधारण
३. वीट – (OBC) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४. उमरड – (OBC) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५. केम – (OBC) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण
६. चिखलठाण – (OPEN) सर्वसाधारण महिला
७. वांगी १ – (OPEN) सर्वसाधारण महिला
८. जेऊर – (OPEN) सर्वसाधारण महिला
९. हिसरे – (OPEN) सर्वसाधारण
१०. कोर्टी – (OPEN) सर्वसाधारण
११. केतूर – (OPEN) सर्वसाधारण
१२. साडे – (OPEN) सर्वसाधारण

या आरक्षणामुळे विविध घटकांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार असून आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
पंचायत समिती बरोबरच जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी गटनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणानुसार सर्वसाधारण तसेच ओबीसी प्रवर्गातील महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे.

गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे :
१. पांडे – सर्वसाधारण महिला
२. वीट – सर्वसाधारण महिला
३. कोर्टी – सर्वसाधारण महिला
४. चिखलठाण – सर्वसाधारण
५. वांगी १ – सर्वसाधारण महिला
६. केम – ओबीसी महिला
या आरक्षणामुळे करमाळा तालुक्यातील महिला उमेदवारांना जिल्हा परिषदेवर संधी मिळणार असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण रंगतदार होण्याची शक्यता आहे.




 
                       
                      