गांजा सेवन करणाऱ्या सहा जणांवर करमाळा पोलिसांची धडक कारवाई -

गांजा सेवन करणाऱ्या सहा जणांवर करमाळा पोलिसांची धडक कारवाई

0

करमाळा(दि.२२): – करमाळा शहर व परिसरातील विविध ठिकाणी गांजा सेवन करत असलेल्या सहा जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली व गोपनीय माहितीच्या आधारे १८ मे २०२५ रोजी ही धडक मोहीम राबवण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे करमाळा पोलिसांनी तालुक्यातील देवळाली येथील ग्रामपंचायतीजवळ जब्बार इस्माईल पठाण (वय ७०, रा. दत्त पेठ, करमाळा), पांडे येथील सरपंच हॉटेलच्या मागे विठ्ठल एकनाथ इंदोरे (वय ७०, रा. वडगाव धायरी फाटा, पुणे), ३६ एकर परिसरातील माधव मुरलीधर ननवरे (वय ३८, रा. म्हसेवाडी, करमाळा), करमाळा स्मशानभूमीजवळ प्रवीण लक्ष्मण साडेकर (वय २८, रा. भवानी पेठ, करमाळा), आयसीआयसीआय बँकेजवळील ओढ्याजवळ राजेंद्र सखाराम सोरटे (वय ५६, रा. चांदगुडे गल्ली, करमाळा) आणि रोशेवाडी येथील नागोबा मंदिराजवळ बाळू बाबा गोडसे (वय ५८, रा. रंभापुरा, करमाळा) या सहा जणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीस हवालदार जोतीराम बाळसराफ, पो.शि. धनाजी रामगुडे, पो.शि. सोमनाथ गावडे, पो.शि. समीर शेख, पो.शि. गणेश शिंदे व पो.शि. अमोल बागल यांच्या फिर्यादीवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!