करमाळा पोलीसांची कमाल - १६ तासात खुनाचा तपास - संशयिताला घेतले ताब्यात.. - Saptahik Sandesh

करमाळा पोलीसांची कमाल – १६ तासात खुनाचा तपास – संशयिताला घेतले ताब्यात..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा,ता.6 : करमाळा पोलीसांनी कमालच केली असून करमाळा हद्दीत कार मध्ये अनोळखी मृतदेह असल्याची माहिती काल (ता.5 ) सायंकाळी साडेसात वाजता समजली. त्यानंतर कार मालक,मृतदेहाची ओळख पटवून, झालेला खूनच आहे व तो प्रेमसंबंधातून झाल्याची खात्री करून सुमारे 225 किलोमीटर अंतरावरील खुन्यांचा शोध अवघ्या 16 तासात केला आहे.

करमाळा एमआयडीसी जवळील कुकडी कॅनलजवळ कार क्रमांक एम.एच.15 सी.टी.8006 मृतदेह असल्याची माहिती करमाळा पोलीसांना समजली. पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे हे तात्काळ घटनास्थळी गेले. सर्व आढावा घेतला.उपविभागीय पोलीस प्रमुख अजित पाटील हे ही घटनास्थळी आले. त्यांनी कारमधील मृत्यूदेह हा खूनच असून तसा तपास सुरू केला.मृतदेहाची शवविच्छेदन केले.

सदर गाडीत मृताचे आधारकार्ड,पॅनकार्ड सापडले, तसेच तपासात येवला येथे मिसिंग दाखल असल्याचे समजले. त्याची माहिती घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे यांचे एक पथक तपास कामी नेमले. या तपासात मयत श्रावण रघुनाथ चव्हाण वय-38 रा.अडसुरे ता.येवला याचा अनैतिकसंबंधातून खून झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल घाडगे, त्याची पत्नी व भाऊ असे हे तीन संशयित आहेत. करमाळा पोलिसांनी याचा 16 तासाच्या आत तपास करुन गुन्हा दाखल केला असून एकजण ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळत आहे. अनैतिकसंबंधातून हा खून झाला आहे. खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा मृतदेह येथे आणला असा संशय आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी तपास झाला असून पुढे सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!