आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील करमाळ्यात सिंधी यांचा जामीन मंजूर..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘करमाळा समाजकारण’ या व्हॉटस्अप ग्रुप वर दोन समाजात तेढ निर्माण होईल; अशी पोस्ट टाकल्याचे पोलीसांच्या लक्षात येताच ग्रुप ॲडमीन व पोस्ट टाकणाऱ्यावर पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शाम सिंधी यांनी करमाळा येथील न्यायालयात ॲड.व्ही.जे.चौरे, ॲड.एस.आर.दिवाण व ॲड. एस.आर.ढेरे यांचेमार्फत जामीनाकरीता अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी करमाळा येथील न्यायाधीश श्रीमती बी.ए. भोसले यांचे समोर झाली. यात शाम सिंधी यांचा जामीन मंजूर झाला आहे.
याच प्रकरणातील व्हॉटस् ॲप ग्रुपचे ॲडमिन नितीन आढाव-पाटील यांचे सह शाम परशुराम सिंधी या दोघांवर करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, या प्रकरणी श्याम परशुराम सिंधी यांना अटक करण्यात आली होती, याप्रकरणी ॲडमिन नितीन आढाव-पाटील यांना बार्शी येथील न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळाला असून, शाम सिंधी यांनी करमाळा येथील न्यायालयात ॲड.व्ही.जे.चौरे, ॲड.एस.आर.दिवाण व ॲड. एस.आर.ढेरे यांचेमार्फत जामीनाकरीता अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी करमाळा येथील न्यायाधीश श्रीमती बी.ए. भोसले यांचे समोर झाली. यामध्ये ॲड.चौरे यांनी युक्तिवाद केला, यामध्ये न्यायाधीश श्रीमती बी.ए. भोसले यांनी शाम सिंधी यांचा जामीन मंजूर केला आहे.