सुलक्षणा कांबळेची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

करमाळा : तालुकास्तरीय शालेय शासकीय पावसाळी क्रीडा स्पर्धा अंतर्गत गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) जेऊर येथे मुलींच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत श्री. गिरधरदास देवी विद्यालय, करमाळा येथील विद्यार्थिनी सुलक्षणा संतोष कांबळे (इयत्ता सहावी) हिने ३३ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.

तिची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे यांच्यासह विद्यालयाचे चेअरमन कन्हैयालाल देवी, सचिव अमोद संचेती, संचालक मंडळ, मुख्याध्यापक संभाजी जगताप व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.




