करमाळा तालुका जुनी पेंशन संघटनेने दिल्लीतील आंदोलनात सहभागी होत केले आंदोलन
केम (प्रतिनिधी संजय जाधव) – जुनी पेंशनच्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानात १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील हजारो कर्मचाऱ्यांनी शंखनाद रॅली काढली होती. यात करमाळा तालुक्यातील जुनी पेंशन संघटनेच्या सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आंदोलन केले.
यामध्ये करमाळा तालुका जुनी पेंशन संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री अरूण चौगुले, श्री साईनाथ देवकर, श्री सतिश चिंदे, श्री विनोद वारे, श्री अजित कणसे, श्री बलभीम बनसोडे, श्री प्रताप राऊत, श्री अशोक दुधे, श्री धनाजी शिंदे, श्री महेश आरडे, श्री पोपट पाटील, श्री शरद झिंजाडे, श्री सुनिल वाकडे , श्री विष्णू गिते आदीजन उपस्थित होते.
1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेंशन बंद करून शेअर मार्केट वर अवलंबून असलेली नवीन पेंशन योजना लागू केली आहे, त्यामुळे या विरोधात 2005 पासून देशातील विविध राज्यांत विविध कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. येणाऱ्या काळात जर जुनी पेंशन योजना लागू केली नाही तर सर्व कर्मचारी शासनाच्या विरोधात जाणार आहेत. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांच्या भावनांचा सहानुभूती पूर्वक विचार करून जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी यावेळी केली.