करमाळा अर्बन बँकेची आर्थिक स्थिती लवकरच सुधारून नियमित कामकाज सुरू होईल – प्रशासक विष्णु डोके
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक प्रगती कडे ठेवीदारांनी सहकार्य करण्याचे बँकेचे प्रशासक विष्णू डोके यांनी आवाहन केले आहे.
कोरोना महामारी व कर्जदारांच्या उदासीनते मुळे थकीत कर्जांचे प्रमाण एन पी ए वाढल्याने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी आर्थिक निर्बंध लादलेल्या दि करमाळा अर्बन बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असून लवकरच बँक आर्थिक निर्बंधातून बाहेर पडून बँकेचे कामकाज नियमित होईल अशी आशा असल्याचे बँकेचे प्रशासक तथा जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग एक चे अधिकारी श्री. डोके यांनी म्हटले आहे बँकेच्या काही ठेवेदारांनी 26 जानेवारी 2024 रोजी ठेवीची रक्कम मिळावी म्हणून उपोषणाचे निवेदन दिले आहे त्या संदर्भात ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले ठेवीदारांनी व सभासदांनी आत्तापर्यंत बँकेस खूप संयम ठेवून सहकार्य केले असून अजून थोड्या सहकार्याची अपेक्षा असुन थकीत कर्जदरांनी कर्ज भरण्याचे अहवान केले आहे सध्या बँकेकडील ठेवी सुरक्षित असून व कर्जाची वसुली चांगल्या पद्धतीने होत असून प्रत्येक महिन्यात वसुलीचा आलेख व बँकेची आर्थिक प्रगती होत असून बँकेचे सर्व कर्मचारी कर्ज वसुलीसाठी मेहनत घेत आहेत दिनांक 31 12 2023 अखेर बँकेचे एकूण कर्ज 10.93 कोटी ,ठेवी 39 कोटी, बँकेचे लिक्विडिटी 34 कोटी तर भाग भांडवल 12.33 कोटी, नेटवर्क प्लस 1.71 कोटी एवढा असून सध्या वसुलीवर जास्त भर असून बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे कडे प्रत्येक ठेवीदारास रुपये 40 हजार फक्त वाटप करण्याचे मागणी केली असून ती लवकरच मंजूर होऊन मिळेल अशी आशा आहे तसेच ठेवीदारांना वैद्यकीय शैक्षणिक व लग्नकार्या साठीच्या अडचणी दूर करण्याकरता त्यानी त्यांचे योग्य ती कागद पत्रे व विहित नमुन्यातील फॉर्म भरून बँकेत दिल्यास बँक योग्य ती कागदपत्रे घेऊन/तपासूनं ती रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवेल.
बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे 29 1 2024 पर्यंत निर्बंध असून त्यानंतर ते पुढील निर्देश जारी करणार आहेत तरी ठेवीदारांनी व सभासदांनी घाबरून जाऊ नये आतापर्यंत बँकेवर जो विश्वास दाखविला व सहकार्य केले तसेच अजून थोडे सहकार्य करून ठेवीदारांनी उपोषणापासून परावृत्त होऊन कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता बिघडू न देण्याचे देखील आवाहन प्रशासक श्री विष्णू व्ही डोके सो व बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.
संबंधित बातमी – बँक पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने २६ जानेवारी रोजी बँकेसमोर आमरण उपोषण करणार – ठेवीदारांचे सहकार आयुक्तांना निवेदन