वांगी १ येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

करमाळा (दि.२३) – वांगी १ येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. लहू श्रीपती कदम विद्यालय यांच्या वतीने रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिमा पूजन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहाजीराव देशमुख तानाजी देशमुख, दत्तात्रय देशमुख, सोमनाथ ढावरे, विष्णुपंत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनीही ठिकठिकाणी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले.

मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी लेझीम, झांज टिपरी नृत्य यांचे सादरीकरण केले. ग्रामस्थांनी प्रोत्साहनपर बक्षीसेही दिली. यावेळी दत्तात्रय ढावरे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील उपशिक्षक सयाजीराव जाधवर सचिन खाडे, सोनाली बुधकर, अमोल ढेकळे, सुवर्णा वैद्य, केशव भुतकर आदींनी परिश्रम घेतले.







