कार्तिक उत्सव यात्रा: कमलाभवानी देवीची विविध वाहनांवरून निघणार मिरवणूक – कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचेही आयोजन

करमाळा (दि.२९) – करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी देवीची कार्तिक उत्सव यात्रा कार्यक्रम ५ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर च्या दरम्यान होणार आहे. यानिमित्ताने देवीची नंदी, गरुड, सिंह, काळवीट, घोडा, मोर, हत्ती आदी वाहनांवरून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या यात्रेचे आयोजन राजेरावरंभा तरुण मंडळ संलग्न कमलादेवी यात्रा समिती व देवीचामाळ ग्रामस्थांकडून केले जाते.

कार्यक्रमपत्रिका – दि. ५-११-२०२५ ते ९-११-२०२५ रोजी पासुन दररोज दुपारी ४ व सायंकाळी ९ वाजता छबिना निघेल. ९-११-२०२५ रोजी मुख्य यात्रा ११.५५ मि. निघेल.


या यात्रेला कलगीतुरे, शाहीर कलावंत, गणेश मंडळाचे संघ झांजपथक, आराधी मंडळ, लेझीम संघ यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राजे राव रंभा तरुण मंडळ संलग्न कमलादेवी यात्रा समिती व समस्त गावकरी देवीचामाळ यांनी केले आहे.
यात्रा उत्सव निमित्ताने दरवर्षी कुस्त्यांचा आखाडा घेतला जात असतो. यंदा कुस्त्यांचा जंगी आखाडा १० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता आयोजित केलेला आहे.

कमलादेवी यात्रा कमिटीचे नूतन पदाधिकारी:
श्री. कमलादेवी यात्रा महोत्सव २०२५ च्या अध्यक्ष पदी रोहन पवार, उपाध्यक्ष पदी आदित्य पवार,खजिनदार पदी विनायक भोसले,सचिवपदी अक्षय बेंद्रे, सहसचिव सागर चव्हाण यांची निवड करण्यात आली. या सर्वांनी भाविकांना यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





 
                       
                      