कमलाभवानी देवीची कार्तिक उत्सव यात्रा १५ नोव्हेंबर पासून सुरू – कुस्ती आखाड्याचेही आयोजन
करमाळा (दि.९) – करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी देवीची कार्तिक उत्सव यात्रा कार्यक्रम 15 नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर च्या दरम्यान होणार आहे. यानिमित्ताने देवीची विविध वाहनांवरून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
कार्यक्रमपत्रिका – दि. १५-११-२०२४ ते १९-११-२०२४ रोजी पासुन दररोज दुपारी ४ व सायंकाळी ९ वाजता छबिना निघेल. १९-११-२०२४ रोजी मुख्य यात्रा ११.५५ मि. निघेल.
या यात्रेला कलगीतुरे, शाहीर कलावंत, गणेश मंडळाचे संघ झांजपथक, आराधी मंडळ, लेझीम संघ यांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राजे राव रंभा तरुण मंडळ संलग्न कमलादेवी यात्रा समिती व समस्त गावकरी देवीचामाळ यांनी केले आहे.
यात्रा उत्सव निमित्ताने दरवर्षी कुस्त्यांचा आखाडा घेतला जात असतो. यंदा कुस्त्यांचा जंगी आखाडा आचारसंहिते मुळे खंडोबाच्या यात्रेच्या दिवशी ७ डिसेंबर २०२४ ला दुपारी ३ वाजता आयोजित केलेला आहे.
श्री. कमलादेवी यात्रा महोत्सव २०२४ च्या अध्यक्ष पदी अविनाश सावंत, उपाध्यक्ष पदी महेश पवार,खजिनदार पदी रत्नदीप पुजारी,सचिव पदी अदित्य पवार यांची निवड करण्यात आली. या सर्वांनी भाविकांना यात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.