जय बजरंगबली टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् तर्फे काशी यात्रेचे आयोजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पोंधवडी येथील जय बजरंगबली टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् तर्फे अधिकमासानिमित्त काशीयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा १८ जुलै ते २४ जुलै या कालावधीत होणार आहे, अशी माहिती या ट्रॅव्हल्स् चे संचालक मयुर रघुनाथ राऊत यांनी दिली आहे. जय बजरंगबली टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् तर्फे २०२३ या सालात चारधाम दर्शन यात्रा, काशी दर्शन यात्रा, दोन ज्योर्तिलिंग दर्शन यात्रा, कन्याकुमारी दर्शन यात्रा, गुजरात दर्शन यात्रा, वैष्णवोदेवी दर्शन यात्रा, केरळ व राजस्थान दर्शन अशा यात्रा १० डिसेंबर २०२३ पर्यंत आयोजित केल्या आहेत. यात्रा रेल्वे व बस प्रवासाने होणार आहे. यात्रेकरूंची भोजन, प्रवास व राहण्याची सोय उत्तमप्रकारे करण्यात आलेली आहे.
अधिकमासानिमित्त काशी, आयोध्या, प्रयाग व सीतामढी या ठिकाणी यात्रा होणार आहे. काशी यात्रेचे आयोजन १८ जुलै २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही यात्रा २४ जुलैला संपणार आहे. या यात्रेसाठी अल्पदरात प्रवेश शुल्क सात हजार रू. असून त्यामध्ये रेल्वे प्रवास, स्लीपर क्लास, बसप्रवास, निवासव्यवस्था व भोजनाची व्यवस्था चांगल्याप्रकारे करण्यात आलेली आहे. ज्यांना या यात्रेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जय बजरंगबली टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स् (मो. ८८८८३३३६३८, ८७६६४५३६८८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मयुर राऊत यांनी केले आहे.