कविटगाव प्राथमिक शाळेत शिक्षकदिन उत्साहात साजरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कविटगाव (ता.करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आपले विचार व्यक्त केले. कु.स्वरांजली हरिदास पांडव हिने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकेच्या भूमिका साकारली होती, याप्रसंगी तिनेही आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!