केमच्या अजिंक्य तळेकरची अमेरिकेतील विद्यापीठात पदवीसाठी निवड
केम : केम( ता.करमाळा) येथील अजिंक्य अंकुश तळेकर याची नुकतीच पदवीच्या शिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात निवड झाली असून तो नुकताच रवाना झाला आहे.
अजिंक्य हा करमाळा मेडिकोज गिल्डचे सदस्य डॉ अंकुश तळेकर व नंदा तळेकर यांचा तो मुलगा आहे. अजिंक्यची नुकतीच बारावी झाली असून त्याची कॉम्प्युटर सायन्स या शाखेतील पदवी साठी युनिव्हर्सिटी ऍट बफेलो (University at Buffelo) येथील ऑनर्स क्लब मध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर त्यालाचांगली स्कॉलरशिप देखील मिळाली आहे.
त्याच्या निवडीनंतर त्याचे केम ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
निसर्गचक्रानुसार मुलांना मोठे करणे, योग्य शिक्षण देणे हे आपले पालक म्हणून कर्तव्य आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही मुलांना कायम आपल्याजवळच ठेवून घ्यायला पाहिजे. मुले अनेकदा शिक्षणासाठी सोलापूर,पुणे, मुंबई,कोटा अशा ठिकाणी जातात, मग पुणे काय आणि न्यूयॉर्क काय? खूप मोठा फरक आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे नक्कीच मुलांच्या करिअरला अग्रक्रमाने साथ देऊन आपण त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना उच्च शिक्षणासाठी वाटेल ती मदत करावी असे मला वाटते. – डॉ.प्रसाद भुजबळ, करमाळा