मांगी तलावाचा 'कुकडी प्रकल्पा'त समावेश करण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावणार - खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर - Saptahik Sandesh

मांगी तलावाचा ‘कुकडी प्रकल्पा’त समावेश करण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावणार – खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मांगी तलाव कुकडी लाभ क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली दि. १ जून रोजी पुणे येथील शासकीय विश्रामगृहात माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर मांगी तलाव लाभ क्षेत्रावरील शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, मांगी तलावाचा प्रश्न घेऊन मला भेटण्यासाठी पुणे येथे आलेल्या शेतकऱ्यांचा हेलपाटा मी वाया जाऊ देणार नाही. मांगी तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात करण्यासाठी उद्याच सिंचन भवन येथे बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावणार आहे. पाण्याबाबत शेतकऱ्यांची तळमळ मला माहिती असल्यामुळे हा प्रश्न मी हाती घेतलेला असून लवकरात लवकर मार्गी लावणारं असल्याचे वचन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

या प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, रावगावचे माजी सरपंच विलास बरडे, पोथरेचे सरपंच धनंजय झिंजाडे, वडगावचे सरपंच प्रतिनिधी लहु काळे, शिवशंकर जगदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संजय घोरपडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी मकाईचे संचालक हरिभाऊ झिंजाडे, आजिनाथ चे माजी संचालक विठ्ठल शिंदे, बिटरगावचे सरपंच अभिजीत मुरूमकर जातेगावचे सरपंच छगन ससाने, करंजेचे सरपंच काका सरडे, लिंबेवाडीचे सरपंच किरण फुंदे, ,पोथरेचे माजी सरपंच विष्णू रंदवे, अमोल पवार, मोहन शिंदे, बाळासाहेब होसिंग, दासा बापू बरडे, भाजपचे पदाधिकारी तसेच मांगी तलाव लाभ क्षेत्रावरील शेकडो शेतकरी या बैठकीसाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!