मारकड वस्ती शाळेत कुंकवाच्या पावलांनी नवागतांचे औक्षण करून स्वागत -

मारकड वस्ती शाळेत कुंकवाच्या पावलांनी नवागतांचे औक्षण करून स्वागत

0

करमाळा (दि. १७): चिखलठाण (ता. करमाळा)  येथील जिल्हा परिषद प्राथमिक मारकड वस्ती शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करत विशेष स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पायांना कुंकवाचा स्पर्श करत, फुलांच्या पायघड्या आणि स्वागतगीताच्या सूरात त्यांचे आगमन उत्सवी वातावरणात झाले.

शाळेच्या प्रांगणात रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. फुलांनी भरलेली पायघड्या, गोडधोड खाऊ आणि पारंपरिक औक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात आले.

या उपक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप व सहशिक्षिका स्वाती जगताप पाटील यांनी केले. “विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, हीच या उपक्रमामागील भूमिका आहे,” असे मुख्याध्यापक तात्यासाहेब जगताप यांनी सांगितले. यावेळी नवागतांना गणवेश, बूट-सॉक्स आणि पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सर्जेराव मारकड, हनुमंत आरकिले, पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!