झरे सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मी आमृळे यांची तर व्हा.चेअरमनपदी अर्जुन गायकवाड यांची निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : झरे (ता.करमाळा) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मी नारायण अमृळे यांची तर व्हा. चेअरमनपदी अर्जुन शिवा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य – अकबर मुलानी, अशोक गुंजाळ, पांडुरंग मावलकर, राजेंद्र मावलकर, महादेव घाडगे, दत्तू चौधरी, कल्याण कोठावळे, कमल कांबळे, अशोक सरोदे, भानुदास बोराटे, महादेव काळे उपस्थित होते. तसेच झरे गावचे ज्येष्ठ नेते नारायण शेठ अमृळे, खंडू काळे, अर्जुन गुळवे, बन्सी घाडगे, किसन घाडगे, प्रशांत चौधरी, सतीश गवळी, उत्तरेश्वर शेळके, नारायण कांबळे, नामदेव चौधरी, महादेव कोकाटे इ.मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा तालुक्यात प्रथम महिला चेअरमन पदाचा मान झरे गावच्या लक्ष्मी नारायण अमृळे यांनी पटकवला आहे. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे स्वागत ॲड. व्ही.व्ही.चौधरी यांनी केले.