प्रशिक्षित जेसीबी ऑपरेटरसाठी परदेशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी - उद्योजक आशिष गुप्ता -

प्रशिक्षित जेसीबी ऑपरेटरसाठी परदेशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी – उद्योजक आशिष गुप्ता

0

करमाळा (दि.५) :  हिवरवाडी रोड, करमाळा येथे ‘लोकनेते भाऊसाहेब चॅरिटेबल ट्रेनिंग सेंटर’च्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन दिनांक 5 जून 2025 रोजी उत्साहात पार पडले. बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या प्रशिक्षण केंद्रात बॅकहू लोडर ऑपरेटर (जेसीबी व तत्सम यंत्र चालवणारे) प्रशिक्षण दिले जाणार असून, यामुळे करमाळा तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांपैकी एक श्री. आशिष गुप्ता (दिल्ली) यांनी उपस्थित तरुणांना उद्देशून दिलेले संदेश विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांनी सांगितले की,  “फक्त ऑपरेटर न राहता तरुणांनी स्वतःची यंत्रसामग्री विकत घेऊन मशीन मालक व्हावे. यामुळे स्वतःची आणि तालुक्याची आर्थिक प्रगती साधता येईल. यासोबतच आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राची महत्त्वपूर्ण माहिती दिली. “IESC चे प्रमाणपत्र हे २२ देशांमध्ये मान्य असून, प्रशिक्षित ऑपरेटरसाठी परदेशातही मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत प्रशासनाच्या वतीने सहकार्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या खजिनदार सौ. वर्षाताई झाडबुके यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “या प्रशिक्षण उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना रोजगार देणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे हा दुहेरी हेतू साध्य करणे होय.”

कार्यक्रमास श्री. नागेश झांजुर्णे, श्री. अभय महाजन, विविध मान्यवर, पत्रकार बंधू, प्रशिक्षणार्थी व झाडबुके बीसीआय महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अतुल ढवळे आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. अमोल बारकुल यांनी केले. समारोपात समन्वयक हमीद काजी यांनी आभार मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!