खासदार, आजी-माजी आमदार यांनी हिरवे झेंडे दाखवून हैदराबाद व पंढरपूर एक्स्प्रेसचा केम स्टेशनवर केला शुभारंभ
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम रेल्वे स्टेशनवर दादर-पंढरपूर-दादर एक्सप्रेस (ट्रेन नंबर ११०२७/११०२८) व मुंबई- हैदराबाद- मुंबई एक्सप्रेस (ट्रेन नंबर २२७३१/२२७३२) या दोन एक्स्प्रेस गाड्यांना केम येथे थांबा मिळाला आहे. त्याचा शुभारंभ काल (दि.७) रोजी केम रेल्वे स्टेशनवर पार पडला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, करमाळा-माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे, करमाळा-माढा मतदार संघाचे माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप आदींनी हिरवा झेंडा दाखवून या दोन्ही एक्स्प्रेसचा शुभारंभ केला.
हा कार्यक्रम रेल्वे विभागाने केम रेल्वे स्टेशनवर आयोजित केला होता.सुरूवातील रेल्वे विभागाच्या वतीने मान्यवारांचा सन्मान केला. या कार्यक्रमात खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले कि केम हे गाव कुंकवासाठी प्रसिद्ध आहे. या गावात मोठी बाजारपेठ आहे. या गावातील दळणवळण रेल्वे वर अवलंबून आहे. पूर्वी येथे हैदराबाद-मुंबई व चेन्नई-मुंबई या गाडया थांबत होत्या. परंतु रेल्वे विभागाने कोरोनाच्या काळात या गाडयाचा थांबा रद्द केला.
यासाठी केम प्रवासी संघटना व्यापारी असोसिएशन, प्रहार संघटना यांनी रेल्वे विभागाकडे प्रयत्न केले. माझ्या केम येथे झालेल्या जनता दरबारात केम ग्रामस्थांनी रेल्वे थांबा ची मागणी माझाकडे केली होती. यानंतर मी पण सोलापूर रेल्वे विभागाला पत्र दिले होते. या मध्ये तांत्रिक अडचणी दाखवल्या प्रसंगी माझी मागणी पूर्ण न झाल्याने मी केमसाठी रेल्वे बोर्ड सदस्याचा राजीनामा दिला. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार माझ्या मागे ऊभे राहिले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांना फोन केला व सर्व खासदारानी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी लावून धरली व केंद्रीय रेल्वे मंत्री आश्वीनी वैष्णव यांनी ही मागणी मान्य करून तसे पत्र सोलापूर रेल्वे विभागाला दिले.
या वेळी व्यासपीठावर रेल प्रबंधक, रेल्वेचे अधिकारी, भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे,माजी सरपंच अजितदादा तळेकर, सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, किरण बोकन, गणेश आबा तळेकर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर आदीजन उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेल्वेचे अधिकारी श्री.गुप्ता यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऊपसरपंच नागनाथ तळेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी केम परिसरातील लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.