तालुका विधी सेवा समितीमार्फत करमाळा येथील कारागृहात ‘कायदेशिर जागरुकता शिबीर’ संपन्न…
करमाळा / संदेश प्रतिनिधी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यु. पी. देवषीं तसेच तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा एम.पी.एखे यांचे मार्गदर्शना खाली करमाळा येथील कारागृहात ‘कायदेशिर जागरुकता शिबीर’ आयोजित करण्यात आले.
या शिबीरास विधी सेवा समिती अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करमाळा एम.पी.एखे उपस्थित होते. तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.आर.ए.बरडे तसेच करमाळा बारचे सदस्य उपस्थित होते. या शिबीरास तहसिलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे तसेच अनेक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ॲड.एन.बी.राखुडे यांनी ‘प्ली बार्गेनिंग’, ॲड.व्हि.जे.चौरे. यांनी ‘कैद्यांचे अधिकार’, ॲड.पी.व्हि.बागल यांनी ‘जामिनाच्या तरतुदी’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी व तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सर्व कायदेविषयक विशेष मार्गदर्शन केले. यावेळी या शिबीरामध्ये विधी सेवा समिती अध्यक्ष एम.पी.एखे यांनी उपस्थित कैद्यांना मार्गदर्शन केले.