‘लढायां पलीकडील शिवाजी महाराज’ या विषयावर करमाळ्यात आज व्याख्यान

करमाळा : करमाळा तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी छत्रपती चौक करमाळा येथे सायंकाळी 7 वाजता शिवचरित्राचे अभ्यासक व इतिहास संशोधक गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. ‘लढाया पलीकडील शिवाजी महाराज’ या विषयावर त्यांचे हे व्याख्यान असणार आहे.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, दुय्यम निबंधक अरविंद कोकाटे, दिलीप गौंडरे (उपअभियंता जि प बांधकाम विभाग), कुंडलिक उबाळे
(उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग) आदी जणांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे.तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
