पुन्हा बिबट्याचे संकट-मांगी शिवारात बिबट्या दिसला -प्रत्यक्ष व्हीडीओ चित्रीकरण

करमाळा,ता.४ (संदेश प्रतिनिधी) : पुन्हा एकदा करमाळा तालुक्यात बिबट्याचे संकट आले आहे. आज (ता.४) सायंकाळी साडेसहा वाजता मांगी शिवारात बिबट्या दिसला. याचा व्हीडीओ प्रितम माळी यांनी काढला आहे.
सायंकाळी श्री. माळी हे चारचाकीतून पोथऱ्याला लिंबे घालून मांगीकडे येत असताना रंदवे वस्तीजवळ बिबट्या पिकअप गाडीला आडवा गेला. त्यावेळी श्री माळी यांनी मोबाईल मध्ये शूटिंग घेतली. हा व्हीडीओ व्हायरल होताच या परिसरात घबराट निर्माण झाली आहे. वनविभागाने यावर लक्ष केंद्रीत करून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. संबंधित व्हिडीओ खाली दिला आहे.



