लोकनेते दिगंबररावजी बागल कृषी व औद्योगिक महोत्सवाची कार्यक्रम पत्रिका जाहीर – राज्यातील विविध मान्यवरांची असणार उपस्थिती
करमाळा तालुक्याचे माजी आमदार व माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त करमाळा येथे कृषी व औद्योगिक महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत त्याची पत्रिका नुकतीच सोशल मीडिया वर बागल गटाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. ५ दिवसात राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तालुक्याबाहेरील मान्यवरांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार नितेश राणे, आ. प्रशांत परिचारक, आ.सचिन कल्याण शेट्टी, आ. रणजित सिंह मोहिते पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंके, माजी मंत्री पंकजा मुंडे, आ.प्रणिती शिंदे आदी व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
- महोत्सव कालावधी – ९ मार्च ते १३ मार्च २०२३
- ठिकाण : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्रांगण, करमाळा जिल्हा सोलापूर.
पूर्ण कार्यक्रम पत्रिका पाहण्यासाठी खालील पोस्टमधील फोटो स्वाईप करा.
करमाळा तालुक्यातील घडामोडी जाणुन घेण्यासाठी आमच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा.