केममध्ये ३० ते ३५ जणावरांना लंपी रोगाची लागण – शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यात लंपी रोगान धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत पशुधन मरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. केम व परिसरातील पाथुर्डी, निंभोरे, मलवडी , वडशिवणे, सातोली या परिसरात या रोगामुळे आत्तापर्यंत दहा जणावरे दगावली आहेत.
केम येथे ३० ते ३५ जणावरांना या रोगाची लागण झाली आहे. या जणावरांना केम बीटचे पशुवैद्यकीय डॉक्टर जाधव यांनी जातीने लक्ष देऊन लसीकरण करत आहेत. येथील राजेंद्र तळेकर यांची एक गाय व संतोष बिचीतकर यांच्या दोन गाई, तर नितीन तळेकर यांची एक गाय दगावली आहे. संतोष बिचीतकर यांच्या गायी मध्ये सुधारणा झाली होती पण पाच दिवसानंतर या गाई दगावल्या.
हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे याचा प्रभाव वाढत आहे. शेतकऱ्यांना याची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या वर्षी अतिवृष्टीमळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठया प्रमाणावर झाले आहे. पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना अजून शासनाकडून मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पशुधन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. या धंदयावर शेतकऱ्याचा प्रपंच भागतो. अगोदर या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यांच्यLहाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आता लंपी रोगामुळे शेतकऱ्याचे पशुधन दगावत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी करायच काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
करमाळा तालुक्यात लंपी रोगाने धुमाकूळ घातला असला तरी केम बीट मधील सात गावात मृत्यू चे प्रमाण कमी आहे. पशुधन मालकांनी जणावरांच्या गोठ्यामध्ये फवारणी करून स्वच्छता राखावी. आजारी जनावरांची काळजी घ्यावी.
–डॉ जाधव, केम बीटचे पशुवैद्यकीय अधिकारी