सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी - मा.आ.नारायण पाटील - Saptahik Sandesh

सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी – मा.आ.नारायण पाटील

करमाळा (दि.२७)  – सततच्या पावसामुळे करमाळा मतदार संघातील पिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी एका लेखी निवेदनातून केली आहे. कृषिमंत्री, महसूलमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना या निवेदनाच्या प्रति पाठवन्यात आल्या आहेत. पीक नुकसान झालेल्या काही भागात पाटील यांनी  भेटून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

याबाबत अधिक सविस्तर माहिती देताना माजी आमदार पाटील यांनी सांगितले कि गेल्या आठ दिवसापासून करमाळा मतदार संघात सत्ताचा पाऊस चालू आहे. यंदा करमाळा तालुका व जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावांत सरासरी पेक्षा जादा पावसाची नोंद झाली असून यामुळे पीक काढणी प्रक्रिया बंद झाली आहे. याचा परिणाम शेतातील उभ्या पिकावर झाला असून मका, उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कापूस, केळी, भाजीपाला आदी सर्वावर झाला आहे. या पीक हंगामातील पिके ही शेतकऱ्यांना थोडा फार आर्थिक नफा मिळवून देत असतात परंतु आता सततच्या पावसामुळे काही प्रमाणात या पिकांची काढणी झाली नाही तर इतर अनेक पिके रानात उभी आहेत. याचा परिणाम शेतकऱ्यांना बसला असून आर्थिक नुकसान होत आहे. तरी महसूल व कृषी या दोन्ही विभागाणी गावोगावी अशा नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे करावेत जेणे करून याचे अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केल्यानंतर शासनाकडून अशा नुकसान झालेल्या पिकांना हेक्टरी नुकसान भरपाई मिळू शकेल. या प्रकारचे आदेश संबंधित विभागांना दिले जावेत अशी मागणीही माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति कृषी व महसूल मंत्री यांना पाठवन्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!