श्रीकमलाभवानी मंदिरात दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका अर्पण - सेवानिवृत्त कॅप्टन श्री.शिंदे यांचेवतीने महापुजा.. -

श्रीकमलाभवानी मंदिरात दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका अर्पण – सेवानिवृत्त कॅप्टन श्री.शिंदे यांचेवतीने महापुजा..

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी : वटपौर्णिमेनिमित्त श्रीकमला भवानी देवीची महापूजा येथील सेवानिवृत्त कॅप्टन भारतीय सैन्यदल मोहन गंगुबाई नामदेव शिंदे यांनीय महापूजा भोगी करून श्री कमलादेवी चरणी दोन लाख रुपये किमतीच्या चांदीच्या पादुका अर्पण केलेल्या आहेत.

स्व.गंगुबाई शिंदे व स्व.नामदेव शिंदे हे सेवानिवृत्त मोहन शिंदे यांचे आई-वडील होते, आई वडिलांची इच्छापूर्ती मुलगा मोहन शिंदे यांनी केली त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले.
मोहन शिंदे यांचा श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान मंदिर समितीचे सचिव अनिल पाटील यांच्या हस्ते श्रीकमलादेवी प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते संजय शिंदे, प्रदीप शिंदे हे त्यांचे बंधू उपस्थित होते.

यावेळी मंदिर समिती विश्वस्त सुशील राठोड, राजेंद्र वाशिंबेकर, व्यवस्थापक अशोक गाठे तसेच मंदिर पुजारी बापू पुजारी, दादासाहेब पुजारी, सचिन सोरटे, किसन आप्पा सोरटे, पुरोहित पुराणिक, रोहित पुजारी, धनंजय सोरटे, योगेश सोरटे सर्व शिंदे परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!