कुंभमेळाव्यावरून परतलेल्या महंत जयंतगिरी महाराज यांचा केम ग्रामस्थांकडून सन्मान

केम(संजय जाधव): येथील ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज हे दोन महिने प्रयागराज कुंभमेळाव्यासाठी गेले होते. त्यांचा तिथे तंबू होता याला श्री उत्तरेश्वर देवस्थान केम ता करमाळा जि सोलापूर (महाराष्ट)असा फलक होता. केम येथील उत्तरेश्वर देवस्थानचे नाव या निमित्त बाबाजीच्या रूपाने कुंभमेळाव्यात झाले याचा केम ग्रामस्थांना अभिमान वाटत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले व याबद्ल ग्रामस्थांच्या वतीने जयंतगिरी महाराज कुंभार महाराज यांचा सन्मान करण्यात आला.

या सोहळयासाठी सामजिक कार्यकर्ते राहुल आबा कोरे, श्री उत्तरेश्वर देवस्थान कमिटिचे सदऱ्य विजय बप्पा तळेकर, उत्तरेश्वर टोंपे, बंडू दौड, आप्पा पारखे सदऱ्य गोरख पारखे , शिवाजी मोरे बबलू पाटिल सिने कलाकार आकाश पेटकर पत्रकार संजय जाधव नारायण बिचितकर, आणा माळी, राजेंद्र भिताडे, दादासाहेब नवले नारायण देवकर अशोक गुरव, ज्ञानेश्वर पळसे, संजय सुतार आदि उपस्थित होते.





