चिखलठाण येथे २७ जून ला महाराजस्व अभियान शिबीर व रस्ता भुमीपूजन कार्यक्रम.. -

चिखलठाण येथे २७ जून ला महाराजस्व अभियान शिबीर व रस्ता भुमीपूजन कार्यक्रम..

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी

करमाळा : चिखलठाण येथे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियान शिबीर तसेच चिखलठाण ते गुलाबराव सरडे वस्ती रस्ता भुमीपूजन कार्यक्रम २७ जून रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे; अशी माहिती आयोजक व लोकनियुक्त सरपंच धनश्रीताई विकास गलांडे व चिखलठाण सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे यांनी दिली.

या अभियानांतर्गत नवीन शिधापत्रिका काढणे, आधारकार्ड नोंदणी, शिधापत्रिका दुरूस्ती, एस.टी. पास, श्रावणबाळ योजना, घरकुल योजना, संजय गांधी निराधार योजना, गॅस योजना, सर्व प्रकारचे दाखले, सर्व कृषी योजनाबाबत अर्ज भरून घेतले जाणार आहे. तसेच चिखलठाण ते गुलाबराव सरडे वस्ती पर्यंत नव्याने होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन कार्यक्रम २७ जून रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास चिखलठाण परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे; असेही आवाहन सरपंच धनश्रीताई विकास गलांडे व चिखलठाण सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!