महाराष्ट्र केसरी पै.बाला रफी कडुन पै.हादी इराणी चितपट.. - Saptahik Sandesh

महाराष्ट्र केसरी पै.बाला रफी कडुन पै.हादी इराणी चितपट..


करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून करमाळा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पन्नास रुपये पासून ते तीन लाखापर्यंत च्या कुस्त्या झाल्या असून, यामध्ये भारत देश व परदेशातील सुमारे तीनशे पैलवानानी सहभाग नोंदविला असल्याचे माहीती या कुस्ती मैदानाचे आयोजक पै सुनिलबापू सावंत यांनी दिली.

या कार्यक्रमात कुस्ती आखाडाचे पुजन.पै, सुरेश शिंदे ,पै, अफसर जाधव पै, भाऊसाहेब खरात यांच्या हस्ते करण्यात आले असुन लगेच कुस्तीस प्रारंभ करण्यात आला शेवटची कुस्ती माण चे अभयसिंह जगताप, धनराज शिंदे ,यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफी शेख व इराण चा पैलवान हादी इराणी यांची कुस्ती लावण्यात आली यावेळी पंच म्हणून महाराष्ट्र केसरी पै, चंद्रहास निमगीरे , उपमहाराष्ट्र केसरी पै,अतुल पाटील,पै, सुरेश शिंदे,पै,अफसर जाधव,पै,राजु भैय्या शेख, पै,आयुब शेख पै बाळासाहेब पडघम आदी जणांनी पंच म्हणून काम केले.

यावेळी नंबर एक ची कुस्ती रात्री दहा वाजता सुरू झाली, यामध्ये महाराष्ट्र केसरी बाला रफी शेख विरुद्ध इराणचा पैलवान हादी इराणी यांच्यात ही कुस्ती अटी तटीने झाली, या लढतीत इराण चा पैलवान हादी इराणी यांच्या वर घिस्सा डावावर चितपट करून विजय मिळवला. त्याच प्रमाणे महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर ही कुस्ती गुणावर पै, पृथ्वीराज पाटील यांनी जिंकली तर पै, भारत मदने विरुद्ध इराण चा पैलवान महादी इराणी यांची प्रेक्षणीय कुस्ती होऊन यामध्ये भारत मदने विजयी झाला.

या कुस्ती मैदानात अत्यंत आकर्षक व कुस्ती प्रेमीच्या डोळ्यात चे पारणे फेडणारी कुस्ती नेपाळचा सुप्रसिद्ध पैलवान देवा थापा विरुद्ध पैलवान अमित लाखा ही कुस्ती मैदानात चालू असताना प्रेक्षकांना आवरता आले नाही पैलवान सुनील बापू सावंत यांनी प्रेक्षकांना शांत करून ही कुस्ती परत सूरु केली यामध्ये देवा थापा विजयी झाला
या मैदानात महाराष्ट्र चॅम्पियन पै, अनिल जाधव, करमाळा येथील पै, शाहरुख खान यांनी प्रतिस्पर्धी वर मात करून विजय मिळवला.

या कुस्ती मैदानावर माण चे अभयसिंह जगताप, माजी पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, भैरवनाथ शुगर चे किरण तात्या सावंत, तहसीलदार शिल्पाताई ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, डॉ, तानाजी भाऊ जाधव , संतोष वारे, पैलवान अस्लम काझी, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अतुल पाटील, माजी सभापती शेखर गाडे, पं स सदस्य राहुल सावंत, महेश चिवटे ,दादासाहेब सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत हाजी अल्ताफशेठ तांबोळी, फारूक जमादार, दिनेश भांडवलकर ,चंद्रकांत काळे, विकास गलांडे ,विजय लावंड, अमोल यादव ,सचिन घोलप, विजय घोलप, सुधाकर काका लावंड, प्रवीण कटारिया, गणेश चिवटे, रामा ढाणे ,श्रेणीक खाटेर , कन्हैयालाल देवी, महादेव फंड, अतुल फंड, भोजराज सुरवसे विजयराव चांदगुडे ,चंद्रकांत सरडे, विलास पाटील, तानाजी झोळ . राजेंद्र बारकुंड ,राजेंद्र बाबर,भरत आवताडे ,आदी मान्यवर उपस्थित होते हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी करमाळा तालुका कुस्तीगीर संघटनेचे प्रमुख पै, सुनील बापू सावंत,पै, दादासाहेब इंदलकर पै, सचिन मालक गायकवाड, पै, नानासाहेब मोरे,पै,पिल्लु इंदलकर पै, श्रीकांत ढवळे पै गणेश सावंत, पै,गणेश आडसुळ. पै, आयुब शेख पै,सुरेश शिंदे पै,भाऊसाहेब खरात पै,वामन पठाडे यांनी परिश्रम घेतले यावेळी कोणताही पोलिस बंदोबस्त नसताना हे कुस्ती मैदान शांततेत पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!