‘माहेर कट्टा महिला ग्रुप’ च्या वतीने नागपंचमीनिमित्त पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन


करमाळा / संदेश प्रतिनिधी : जेऊर (ता.करमाळा) येथील ‘माहेर कट्टा महिला ग्रुप’ च्या वतीने नागपंचमी निमित्त महिलांचे भारुड, पंचमीची गाणी पारंपरिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
येथील डॉ शारदा सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली माहेर कट्टा ग्रुप यांच्यावतीने नागपंचमीनिमित्त जेऊर येथील महिलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुरवातीला नागाच्या आकाराचे फुगे तयार आकाशात सोडत कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी नागा विषयीच्या अंधश्रद्धा याविषयीची माहिती डॉ. सुराणा यांनी उपस्थित महिलांना दिली महिलांसाठी विविध पारंपरिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
त्यानंतर महिलांचा भारुड यांचा कार्यक्रम करण्यात आला शेवटी फेर धरून नागपंचमीची विविध गाणी म्हणत कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे नियोजन तनिष्का गटाच्या प्रमुख अपर्णा पाथ्रुडकर यांनी केले होते तर या कार्यक्रमाला कांचन राठोड कल्पना आखाडे, मनिषा लोंढे, येवले बोराडे, मेहता मॅडम, ननवरे घाडगे ताई यांच्यासह बहुसंख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.



