कंदर येथे मैत्री फाऊंडेशन तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार..

कंदर प्रतिनिधी /संदीप कांबळे.. कंदर येथे आज स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. कंदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप तसेच मैत्री फाउंडेशन मधील सदस्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 1988 ला शिकवायला शिक्षक होते ते भाळवणी येथील गोवर्धन भोसले यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतिल पार्थक बैरागी आणि वैष्णवी बैरागी या भाऊ बहिणीचा कुस्ती स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्ञानेश्वरी फरतडे हिचा MHT,CET परीक्षेत 99.98% गुण मिळवून मुलीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक आला याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. तसेच कंदर चे लोकनियुक्त सरपंच मौला मुलाणी उपसरपंच अमर भांगे यांचा सत्कार करण्यात आला.

वैज्ञानिक पदी कंदर ऋषिकेश अशोक घाडगे याची निवड झाल्याबद्दल बद्दल मैत्री फाउंडेशन तर्फे गौरविण्यात आले. याप्रसंगी मैत्री फाउंडेशन चे अध्यक्ष अनिल फरतडे दिलावर शेख सचिव नाना फरतडे अण्णासाहेब कदम संभाजी लोंढे दत्ता केदार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



