पुणे शिक्षक मतदार संघातून मंगेश चिवटे यांची शिफारस करू – रोजगारहमी मंत्री गोगावले

0

करमाळा(दि.२०): आरोग्य सेवेच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी स्वतःचा ठसा संपूर्ण राज्यात उमटवला असून जी जबाबदारी दिली ती ते सक्षमपणे पार पाडतात. यामुळे आज प्रहार शिक्षक संघटनेसह विविध शिक्षक संघटनांनी पुणे शिक्षक मतदार संघातून मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे.  या भागातील शिक्षकांच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहोचवून
मंगेशच्या उमेदवारीची शिफारस करू असे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी काल शनिवारी (दि.१९) करमाळ्यात केले.

नृसिंह चिवटे यांच्या ८५ व्या अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार बच्चू कडू, राष्ट्रीय कीर्तनकार संग्राम बापू भंडारी, शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, माजी आमदार जयवंतराव जगताप, इतिहास संशोधक विश्वासराव पाटील, गोंदिया जिल्ह्याचे आमदार चंद्रिकापुरे, शिवचरित्र वक्ते यशवंत गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी भरत शेठ गोगावले यांच्याकडे केली

एकनाथ शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष अडसूळ यांनी सांगितले की, “सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार शिक्षक मते मंगेश यांनाच मिळणार आहेत. पुणे विभागातील १६ शिक्षक संघटनांनी लेखी मागणी करून मंगेश चिवटे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.” लवकरच सोलापूरमध्ये पाच हजार शिक्षकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून, त्या वेळीही ही मागणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडली जाणार आहे.

राष्ट्रीय कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी मंगेश चिवटे यांच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले, “मंगेश चिवटे यांनी आरोग्यसेवा करताना जात, धर्म, पंथ न पाहता मदत केली. असा सेवाभावी व्यक्ती विधान परिषदेवर पोहचल्यास सर्वसामान्यांचा खऱ्या अर्थाने आवाज होईल. वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही त्यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देतो.”

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!