तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मांगीच्या शाळेला उपविजेतेपद
करमाळा (दि.२७) – करमाळा तालुक्यातील केतुर नं. 2. येथील नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये १७ वर्षाखालील वयोगटातील मांगी येथील प्रगती विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले.
या स्पर्धेमध्ये जवळपास 17 संघाने सहभाग नोंदवला होता.
मांगी येथील प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ देवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक श्री पोळ सर ,
ऊबाळे सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याकडून दैनंदिन सराव करून घेतल्यामुळे प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उपविजेतेपदाची ट्रॉफी मिळवता आली.
या दमदार कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शामल काकी बागल ,उपाध्यक्ष अंबऋषी देशमाने ,संचालिका रश्मी दिदि काेलते -बागल , दिग्विजय भैय्या बागल,
उपसरपंच नवनाथ बागल, हनुमंत दादा बागल स्पर्धकांचे विशेष अभिनंदन केले. तसेच शाळेमध्ये ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.