करमाळ्यात मनोज जरांगे पाटील यांची धावती भेट; कार्यकर्त्यांशी संवाद, आंदोलनाचा इशारा -

करमाळ्यात मनोज जरांगे पाटील यांची धावती भेट; कार्यकर्त्यांशी संवाद, आंदोलनाचा इशारा

0

करमाळा : स्थानिक प्रशासन कुणबी दाखला देताना मराठा समाजाची अडवणूक व पिळवणूक करत असेल तर मला पुन्हा मैदानात उतरावे लागेल, असा इशारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची करमाळयात ‘सकल मराठा समाज’च्या  कार्यकर्त्यांशी बोलताना दिला.

वरकुटे (ता. करमाळा) येथे शहीद जवान नवनाथ गात स्मृतिदिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज जरांगे पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.  या पार्श्वभूमीवर ते करमाळ्याला आले होते. यावेळी त्यांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना धावती भेट देऊन संवाद साधला.

शहरातील छत्रपती चौक परिसरात फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण व ढोल-ताशांच्या गजरात जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध प्रश्नांची माहिती घेतली व अल्पावधीत मार्गदर्शन केले. मराठा समाजाच्या ओबीसी कुणबी दाखल्यांच्या संदर्भात कुर्डवाडी प्रांत कार्यालयाकडून होत असलेल्या अडचणींबाबतही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर मुद्दा मांडला.

या विषयावर बोलताना जरांगे पाटील यांनी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा सल्ला दिला. शासन-प्रशासनाकडून समाजाची पिळवणूक व फसवणूक होत असल्यास स्वतःलाही मैदानात उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने कुणबीच्या दाखल्यासंदर्भामध्ये लवकरच जन आंदोलन उभा करून उपोषण करणार आहे.
सचिन काळे, मराठा आंदोलक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!