राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत केमची मानसी चव्हाण द्वितीय

केम(संजय जाधव): पुणे येथील महालक्ष्मी लॉन्स येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत, स्मार्ट क्लासेस, केमची विद्यार्थिनी मानसी चव्हाण हिने देशभरातील १५०० स्पर्धकांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानसीचा ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी सिनेअभिनेत्री मधुराणी गोखले यांनी अबॅकस शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “अबॅकस हे शिक्षण जादूटोण्यापेक्षा कमी नाही. पालकांनी आपल्या मुलांना हे कौशल्य अवश्य द्यावे.”

या कार्यक्रमास अबॅकस क्लासेसच्या संचालिका सोनल कुलकर्णी व प्रियांका ओहोळ उपस्थित होत्या. मानसी चव्हाण हिने मिळवलेल्या यशाबद्दल केम परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.


