शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकांनी रस्ता रोखो आंदोलनात सहभागी व्हावे : सुनिल सावंत -

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकांनी रस्ता रोखो आंदोलनात सहभागी व्हावे : सुनिल सावंत

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कांद्याला हमीभाव, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, तसेच विविध वस्तुंवरील महागाई, गॅसचे, पेट्रोल-डिझेलचे वाढवलेले अशा एक ना अनेक मागण्यासाठी येत्या सोमवारी १३ मार्च रोजी करमाळा येथील जामखेडरोड बायपासचौकात सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार असुन, या आंदोलनात शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सांवत गटाचे नेते सुनिल सावंत यांनी केले आहे.

याबाबत तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कांद्याला बाजारात दर नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, महाराष्ट्र शासनाने नाफेड ची केलेली घोषणाचे पुढे काय झाले तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकरी ना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही तसेच सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेली महागाई डिझेल-पेट्रोल चे वाढलेले दर कमी करण्यात यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असे या निवेदनात म्हटले आहे

या दिलेल्या निवेदनावर सुनिल सावंत, बबन जाधव, मनोज गोडसे, प्रदीप हिरडे, रघुनाथ झिंजाडे, मोहन शिंदे, सुरेश जाधव, फारुक जमादार, नवनाथ झिंजाडे, पांडुरंग शिंदे, बापू उबाळे, चंद्रकांत पवार आदी च्या सहया आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!