पोथरे येथे १२ एप्रिलला सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा – ६ एप्रिल पासून हरिनाम सप्ताह सुरू
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करताना खूप कष्ट घेतात. मुलांचा सांभाळ करणे, त्यांना स्वतः च्या पायावर उभे करणे, शिक्षण, संस्कार, पैसा आदी त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवतात. मुलांना सुखात पाहण्यासाठी आपल्या हयातीपर्यंत शक्य त्या रीतीने ते प्रयत्न करत असतात. अशा आई-वडिलांचा सन्मान मुलांकडून करण्यात यावा यासाठी पोथरे (ता.करमाळा) येथील भैरवनाथ यात्रा समितीने येत्या १२ एप्रिलला सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा आयोजित केला आहे.
ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाने यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहामध्ये यावर्षी 12 एप्रिल सामूहिक मातृ-पितृ पूजन सोहळा ठेवला आहे. आतापर्यंत 120 आई-वडिलांची नाव नोंदणी झालेली आहे. आणखी ज्यांना मातृ-पितृ पूजन सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी हनुमान भजनी मंडळाचे सदस्य शांतीलाल झिंजाडे (9922019770), गंगाधर शिंदे (9822768285), शिवाजी आप्पा झिंजाडे (7498533404), आबासाहेब भांड (9822086597) विलास महाराज शिंदे (9657645990) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पोथरे (ता.करमाळा) येथील भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या सप्ताहाचे हे सोळावे वर्ष असून यावर्षी 6 एप्रिल 2023 ते 13 एप्रिल 2023 या दरम्यान या हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. या सप्ताहामध्ये विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तने व प्रवचने आयोजित केलेली आहेत. याच प्रमाणे दैनंदिन काकडा, भजन,विष्णुसहस्त्रनाम आदी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. या सप्ताहाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन भैरवनाथ यात्रा कमिटीने केलेली आहे.
हरिनाम सप्ताहाची कार्यक्रम पत्रिका खाली दिली आहे-
