महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक करमाळ्यात संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आजच्या विज्ञान युगामध्ये वाढत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व विवेकनिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यावरती विशेष जबाबदारी आलेली आहे
असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा करमाळा या शाखेची विशेष बैठक यशकल्याणी ग्रामिण सेवाभावी संस्थेच्या सभाग्रहामध्ये संपन्न झाली, या बैठकीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष माधव बावगे व महाराष्ट्रच्या सरचिटणीस रुकसाना मुल्ला, प्रा.गणेश करे-पाटील, प्राचार्य नागेश माने आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये संघटना वाढीबद्दल चर्चा करण्यात आली, त्याचबरोबर करमाळा तालुक्यात असणाऱ्या महाविद्यालयामध्ये विवेक वाहिनी शाखा तयार करण्याबद्दल चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये अध्यक्ष गणेश करे-पाटील माजी प्राचार्य नागेश माने यांनी उत्तमरीत्या मार्गदर्शन केले व चर्चा विनिमय होऊन बैठक संपवण्यात आली.
यावेळी दिगंबर साळुंखे संजय हंडे रामचंद्र बोधे गुरुजी बाळासाहेब दुधे संतोष माने अनिल माने राजेंद्र साने भिवा वाघमोडे संगीता निंबाळकर आदि जन उपस्थित होते अनिल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी बैठकीची सांगता समाज उपयोगी चळवळीच्या गीताने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल माने यांनी केले तर आभार बाळासाहेब दुधे यांनी मानले.