माजी आमदार जगताप यांनी केलेली मदत स्मरणात ठेवून कार्य करू – खासदार धैर्यशील मोहिते पाटील :

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मोहिते-पाटील कुटुंबीयांच्या अडचणीच्या काळात नेहमीच मदत केलेली आहे, त्याचे मोहिते-पाटील कुटुंबियातील तिसऱ्या पिढीला नक्कीच स्मरण असून त्याची उतराई करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही माढ्याचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिली.
खासदार मोहिते पाटील आज करमाळा दौऱ्यावर असताना बाजार समितीचे कार्यालयात त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली त्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ चे माजी संचालक अंकुश साखरे होते. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . याप्रसंगी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करून स्वागत केले.
यावेळी बोलताना माजी आमदार जगताप म्हटले कि, जिल्ह्याच्या राजकारणात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि देशभक्त नामदेवराव जगताप यांच्यात तात्विक मतभेद जरी असले तरी जिल्हयाच्या विकासात्मक कामां करिता ते वेळोवेळी एकत्र येत असल्याचे आवर्जून नमूद करीत १९६२ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीचे उदाहरण दिले. तसेच २०१४ साली लोकसभा निवडणुकीत विजयदादा व २०२४ साली धैर्यशील भैय्या यांना करमाळा तालुक्यातील जनतेने मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे याचे नूतन खासदार यांना आठवण करून देत त्यांनी विकास कामांमध्ये करमाळा तालुक्याला झुकते माप देणे बाबत आवाहन केले.
यावेळी माजी आमदार जगताप यांनी नारायण आबा पाटील यांच्याकडे पाहत करमाळा तालुक्याच्या राजकारणात ज्यावेळी दोन सुवासिनी एकत्र येतात त्यावेळी निश्चितच निकाल चांगला लागतो असे म्हणताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला व एकच हशा पिकला .
या प्रसंगी करमाळा तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक पदी मनोहर गुंडगिरे , दादासाहेब कोकरे , वैजिनाथ कदम व संभाजी रिटे यांची निवड झाल्याबद्दल खा मोहीते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप , माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी , नगरसेवक अतुल फंड , श्रेणिक खाटेर , नजीर अहमद शेख , बाजार समितीचे उपसभापती बबन मेहेर , संचालक महादेव कामटे , नागनाथ लकडे , आण्णासाहेब पवार ,शिवाजी राखुंडे , जनार्दन नलवडे , रामदास गुंडगिरे ,सागर दोंड,मनोज पितळे, परेश दोशी ,माजी संचालक दादासाहेब जाधव , औदूंबर मोरे , मयूर दोशी, देवानंद बागल , खरेदी विक्री संघाचे संचालक महादेव डुबल , दादासाहेब लबडे , शहाजी शिंगटे , हनुमंत ढेरे , आदिनाथ चे प्रशासकिय संचालक ॲड दिपक देशमूख , अजित तळेकर , बापू रिटे, डॉ .अमोल घाडगे , विक्रांत मंडलेचा , राजेंद्र चिवटे , अमर साळुंखे , जोतीराम ढाणे , दिलीप दोंड ,आनंद शिंदे , शहाजी धुमाळ ,बंटी जाधव , पांडूरंग बोराडे , संतोष शिंदे , वंदन नलवडे , दादासाहेब वारे , संतोष ढेरे, कासम पठाण ,यांचे सह जगताप गटाचे प्रमूख पदाधिकारी , कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रास्ताविक दत्तात्रय भागडे यांनी तर आभार यूसूफ शेख यांनी मानले.
सध्या करमाळा तालुक्याचे राजकारणात आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्रित असून २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत संजय मामांना विजयी करण्यात जगताप यांचा सिंहाचा वाटा होता. आजच्या कार्यक्रमात मोहिते पाटील व जगताप यांच्या बरोबरच माजी आमदार नारायण पाटील यांची उपस्थिती ठळकपणे लक्ष वेधून घेत होती . यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतील हालचालींना प्रचंड वेग आल्याचे मात्र प्रकर्षाने जाणवू लागले आहे.



