श्री भैरवनाथ दूध संकलन केंद्रामार्फत आमदार श्री.शिंदे यांच्या हस्ते सभासदांना साखर वाटप..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वीट (ता.करमाळा) येथे आज श्री भैरवनाथ दूध संकलन केंद्रामार्फत दिपावली निमित्त सभासदांना साखर वाटप कार्यक्रम आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेशभाऊ चिवटे, माजी जि.प.सदस्य, उध्दवदादा माळी, वीटचे जेष्ठ नेते वसंतनाना गाडे, अंजनडोहचे सरपंच विनोद जाधव, वीटचे सरपंच उदय ढेरे, बाळासाहेब ढेरे, अशोक चोपडे, संदीप ढेरे, राजू शिंदे, तेजेस ढेरे, केशव चोपडे, श्रीकांत ढेरे, संतोष ढेरे, गणेश जाधव, संजय ढेरे, शिवाजी ढेरे गुरुजी, हनुमंत ढेरे, धनंजय आवटे, नागनाथ आवटे, विश्वनाथ ढेरे, नानासाहेब ढेरे, संजय आवटे, किरण ढेरे तसेच संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे आयोजक मा.हेमंत आवटे व संस्थेचे सर्व सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.