नागपूर अधिवेशनातून करमाळा उपजिल्हा रुग्णालय बांधकामासाठी अडीच कोटींची मंजुरी – आमदार पाटील

केम(संजय जाधव): नागपूर येथे सोमवारपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा आमदार नारायण पाटील करत आहेत. पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यासाठी त्यांनी पहिल्या दिवशी करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील १०० खाटांच्या इमारत बांधकामासाठी लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा केला.

या मागणीनंतर शासनाकडून इमारत बांधकामासाठी दोन कोटी ५२ लाख ३१ रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी दोन कोटी रुपये संबंधित विभागाकडे वर्ग केल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली.
अधिक माहिती देताना आमदार पाटील म्हणाले की “करमाळा उपजिल्हा रुग्णालयात १०० खाटांची मागणी आपण या पुर्वीच केली होती. त्यास मंजुरी मिळवण्यात यश आले होते. आता रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पाठपुरावा सुरु आहे.



