वाळू माफियांवर कारवाई करा - आमदार पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली मागणी - Saptahik Sandesh

वाळू माफियांवर कारवाई करा – आमदार पाटील यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली मागणी

करमाळा (दि.२५) –   उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. करमाळा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या दिवसेंदिवस या वाळु उपशाचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी हे निवेदन दिलेले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील उजनी धरणाकाठावरील वांगी, चिखलठाण, खातगाव, येथे वाळू उपसा अवैधरित्या सुरु असल्याच्या तक्रारी महसूल विभाग व माझ्याकडे येत आहे. गेले वर्षापासून करमाळा तालुक्यातील सीना नदी भीमा नदी व उजनी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून तालुक्यातील रस्ते खराब होऊ लागले आहेत तसेच सदर वाळू उपसा हा शासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता दिवसरात्र सुरु आहे. उजनी धरणातील लाखो ब्रास वाळू माफिया उचलत असल्यामुळे शासनाचा महसूल (रॉयल्टी) बुडत आहे.

पोलिसांची व महसूल विभागाच्या अधिकारी यांची भूमिका माफियांना प्रोत्साहन देणारी असल्याची चर्चा आहे. अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. वाळू माफिया हे  साम, दाम दंडासह लोकांना धमकावून,आर्थिक तोड-पाणी करून गावागावात दहशतीचे वातावरण करत आहेत. गावातील सलोखा बिघडत चालला आहे. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात वाळू माफियांचा उघड वावर असल्याचे लोक खाजगीत बोलत आहेत. अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफी यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी अवैध वाळू वाहतुकीमुळे करमाळा तालुक्यातील रस्ते खराब होत असून अपघाताचे प्रमाण वाढत असून त्यामुळे शासनाचे रस्ते दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. एका बाजूला उजनी पर्यटनासाठी शासन प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱ्हास हे वाळूमाफिया करत आहेत. करमाळा तालुक्यातून उजनी धरणातील अवैधरित्या वाळू उपसा माफियावर योग्य कारवाई करावी.

करमाळा तालुक्यात गेली दीड दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे करमाळा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या सीना नदीतून तसेच भीमा नदी पात्र व उजनी धरणातून हा अवैदरीत्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यामुळे वाळू माफी यांची दहशत या भागात वाढली असून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वाळू उपसा करत असताना दमदाटी करणे धमकावणे जीवे मारण्याची धमकी देणे असे प्रकार वारंवार घडत आहेत तसेच वाळू वाळू उपसण्यावरून मागील काही दिवसापूर्वी करमाळा तालुक्यात जीव घेणे हल्ले झाले आहेत मात्र याबाबत पोलिसांनी व महसूल अधिकारी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेचे दिसून येत नाही.

विधानसभा निवडणूक झाल्यापासून माझ्याकडे वाळू उपसा सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षापासून हा वाळू सुरू आहे. या वाळू उपशातून अनेक तंटे निर्माण होत आहेत शासनाचा महसूल पडत आहे रस्ते खराब होत आहेत पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे या वाळू उपशाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे आणि हा वाळू उपसा बंद झाला पाहिजे.तसेच वाळू माफिया यांचेवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करून उपसा बंद झाला नाही तर याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.
आमदार नारायण पाटील, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!