एसटी अपघातातील जखमींची आमदार पाटील यांनी घेतली भेट

करमाळा (दि.१) : रावगावजवळ एसटी बस पलटी झाल्याची बातमी समजताच करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे आमदार नारायणआबा पाटील यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. काल (दि.३१) झालेल्या अपघातातील रुग्णांची विचारपूस करत असताना एसटी बस विषयी लोकांनी आमदारांकडे तक्रारीचा पाढा वाचला.
सध्या करमाळा आगारातील सर्वच एसटी बस गाड्यांची अवस्था बिकट झाली असल्याने हे अपघात घडत आहेत दुर्दैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु बस मधील जवळपास 23 जण जखमी झाले असून सध्या त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्यामधील बऱ्याच लोकांना जबर मुक्कामार लागला आहे. 3-4 जणांना हाता-पायला जबर मार लागला असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. उपचारासाठी लागणारी सर्व काही मदत संबंधित डॉक्टर अधिकाऱ्यांना करण्याच्या सूचना दिल्या असून एसटी महामंडळाकडून ही जखमींना मदत करणार असल्याच सांगितलं तेव्हा एसटी मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवीन एसटी गाड्या संदर्भात योजना जाणून घेतल्या व यापुढे नादुरुस्त गाड्या बाहेर सोडू नका अशा सूचना दिल्या.
संबंधित बातमी : रावगाव जवळ एसटी पलटी होऊन झाला अपघात – जखमींवर उपचार सुरू




