मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करमाळा तालुका अव्वल - योजनेतील ३०,९९६ अर्ज मंजूर : आमदार संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करमाळा तालुका अव्वल – योजनेतील ३०,९९६ अर्ज मंजूर : आमदार संजयमामा शिंदे


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमणूक : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची योजना १ जुलै २०२४ पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झाली असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महाराष्ट्रामध्ये करमाळा तालुका अव्वल ठरला असून या कामांमध्ये योगदान देणारे अंगणवाडी सेविका व ग्रामपंचायत संगणक ऑपरेटर यांचा सन्मान आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

करमाळा तहसील ,पंचायत समिती, महिला व बालविकास विभाग यांनी केलेल्या अचूक नियोजनबद्ध कामामुळे तसेच गावपातळीवरती मेळावे घेणे, बैठका घेणे, ऑनलाइन केंद्र चालवून अर्ज भरायला मदत करणे, मोफत ऑफलाईन अर्जांचे वितरण करणे, तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये या कामासाठी मदत कक्ष सुरू करणे आदी कामे आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महाराष्ट्रामध्ये करमाळा तालुका अव्वल ठरला आहे.

करमाळा तालुक्यातून आजअखेर आलेल्या ३४,३६२ अर्जापैकी ३०,९९६ अर्ज मंजूर झालेले असून या बहिणींना राखीपोर्णिमेनिमित्त दि.१९ ऑगस्ट रोजी पहिल्या २ महिन्यांचे म्हणजेच प्रत्येकी ३,००० रुपये वितरित केले जाणार आहेत तर २,४१६ अर्ज फेर सादर करण्यात आलेले आहेत. त्रुटी पूर्ततेनंतर ते अर्जांना मंजुरी मिळू शकते एकूणच सर्व अर्जाना मंजुरी देणारा करमाळा हा राज्यातील पहिलाच तालुका ठरला असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार शिंदे यांनी दिली.

या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत असल्याने जास्तीजास्त बहिणींनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले असून ही योजना प्रभावीपणे राबविण्याकामी प्रयत्न करणाऱ्या या योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या सदस्य-सचिव तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे,पं.स.गटविकासाधिकारी मनोज राऊत, महिला व बालविकास अधिकारी ,कर्मचारी,सर्व ग्रामपंचायतींचे ऑपरेटर्स, अंगणवाडी सेविका,कार्यकर्ते यांचे अभिनंदन केले आहे. या बाबतीत काही अडचणी असतील तर तहसील प्रांगणामध्ये यासाठी मदत कक्ष सुरू असून त्या ठिकाणी आपण अर्ज जमा करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!