करमाळ्यात प्रशासकीय इमारतींच्या बांधकामासाठी 34 कोटी निधी मंजूर :
आमदार संजयमामा शिंदे..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शहरातील पंचायत समिती, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, पोलीस स्टेशन इत्यादी सर्वच प्रशासकीय इमारती या जीर्ण झाल्या असून, प्रशासकीय कामकाजासाठी नवीन प्रशासकीय इमारतीची गरज ओळखून आपण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे प्रशासकीय संकुल बांधकामासाठी 35 कोटी निधीची मागणी केली होती ती मागणी आता महायुतीच्या कार्यकाळात मंजूर झाली असून करमाळा शहरातील प्रशासकीय संकुलासाठी 34.68 कोटी तर कुर्डूवाडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी 1.77 कोटी निधी असा जवळपास 37 कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.


याविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू असून या अधिवेशनामध्ये करमाळा तालुक्याच्या हिताच्या महत्त्वाच्या बाबी पूर्णत्वास जात आहेत याचे समाधान आहेत .याच अधिवेशन कार्यकाळामध्ये कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजुरीचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर दहिगाव योजनेतील शिल्लक पाण्यात इतर गावे समाविष्ट करण्यासाठी सर्वेक्षणाचे आदेश या कामांबरोबरच इमारत बांधकामासाठी भरीव निधी मिळाल्यामुळे करमाळा शहराच्या वैभवात तर भर पडेलच परंतु गेल्या अनेक वर्षापासून सर्वच शासकीय कार्यालय एकाच इमारतीत हवेत ही प्रशासकीय संकुलाची मागणी पूर्णत्वास जात आहे .या बजेटमध्ये राज्य मार्ग ,प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यासाठीही मोठ्या प्रमाणावरती निधी लवकरच उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!