करमाळा तालुक्यात झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानीची आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून पाहणी.. -

करमाळा तालुक्यात झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे नुकसानीची आमदार संजयमामा शिंदे यांचेकडून पाहणी..

0


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यात 28 एप्रिल रोजी अचानक उद्भवलेल्या वादळामुळे व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील केळी ,पपई ,आंबा , लिंबोणी आदी फळबागांबरोबरच तरकारी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. या वादळात झाडे अंगावर पडून काही जनावरेही मृत झालेली होती. 1 मे रोजी देवळाली व खडकेवाडी येथील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केली. याप्रसंगी त्यांचेसोबत प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे , कृषी सहाय्यक ,ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.


28 एप्रिल रोजी दुपारनंतर करमाळा तालुक्यातील चिखलठाण, शेटफळ, वाशिंबे, उमरड, देवळाली, सरपडोह आदी जवळपास 30-35 गावांमध्ये वादळामुळे व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, संपूर्ण तालुक्यातील नुकसानीचा सर्वे करून त्याचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे अशा सूचना आमदार शिंदे यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी सुजित तात्या बागल , बाळनाथ जगदाळे, माजी सरपंच आशिष गायकवाड, सरपंच गहिनीनाथ गणेशकर, ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे ,प्रकाश कानगुडे, चेअरमन रामभाऊ रायकर ,संजय कानगुडे ,प्रभारी तहसीलदार जाधव साहेब ,तालुका कृषी अधिकारी वाकडे साहेब, सर्कल राउत साहेब, तलाठी शितल सूर्यवंशी मॅडम, ग्रामसेवक श्रीधर नागरसे, कृषी सहाय्यक महेश रांजुण व देवळाली खडकेवाडीतील शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!