जिल्हा नियोजन मंडळातून विकासासाठी 3 कोटी 10 लाख निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरीचे आदेश : आमदार संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

जिल्हा नियोजन मंडळातून विकासासाठी 3 कोटी 10 लाख निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरीचे आदेश : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सन 2022 – 23 च्या जिल्हा नियोजन मंडळाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे, या शीर्षकांतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी 54 कोटी निधी मंजूर असून, त्यापैकी करमाळा तालुक्यातील 92 गावातील नवबौद्ध वस्त्यांच्या विकासासाठी 3 कोटी 10 लाख मंजूर निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरीचे आदेश मिळाले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.


या निधीमधून करमाळा तालुक्यातील केतुर नंबर 2 ,कोळगाव, कोर्टी ,पोटेगाव, पांडे, रोशेवाडी, सालसे, वीट, विहाळ, देवळाली, गुळसडी ,आवाटी ,घोटी, कंदर, खडकी, निमगाव ह, नेरले ,शेटफळ ,उंदरगाव, वांगी नंबर 2, झरे, कुगाव, साडे ,शेलगाव क,भोसे ,हिसरे, भाळवणी, कामोणे, मलवडी ,गोरेगाव ,अंजनडोह, हिवरवाडी, केडगाव आदी 92 गावांमध्ये रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, अंतर्गत भूमिगत गटार बांधकाम करणे, पेविंग ब्लॉक बसविणे ,पाणीपुरवठ्याची सोय करणे, पेविंग ब्लॉक रस्ता बनविणे, आरो प्लांट बसविणे, रस्ता खडीकरण करणे इत्यादी कामे केली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून बंदिस्त व्यायाम साहित्य साठी 20 लाख निधी…
करमाळा तालुक्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांचेकडून बंदिस्त व्यायाम साहित्यासाठी 20 लाख निधी मंजूर झालेला आहे. या मंजूर निधी मधून रावगाव ,कविटगाव, शेलगाव क येथे प्रत्येकी 5 लाख याप्रमाणे बंदिस्त व्यायाम साहित्य वितरित केले जाणार आहे. तसेच व्यायाम शाळा बांधकामासाठी स्वतंत्रपणे निधी मंजूर केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!