करमाळा तालुक्यासाठी अल्पसंख्यांक विभागाकडून २ कोटी निधी मंजूर :
आमदार संजयमामा शिंदे


करमाळा / संदेश प्रतिनिधी : राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत / पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय झाला असून, त्यानुसार निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.


याविषयी अधिक माहिती देताना आम.श्री.शिंदे म्हणाले की,
सोगांव (प )येथे कब्रस्थान वॉल कंपाऊंड बांधणे व सुशोभिकरण करणे,मौजे कंदर येथे ईदगाह कंपाऊंड बांधणे व परिसर सुशोभिकरण करणे,केम येथील रेल्वे लाईन लगत कब्रस्थान वॉल कंपाऊंड बांधणे व पाणी पुरवठा सोय करणे, मुलाणी कोपरा ते पोपट खरबडे रस्ता काँक्रीटीकरण करणे,साडे येथे कब्रस्थान परिसर सुधारणा करणे व पाणी पुरवठा सोय करणे, वडगांव (उ) येथे कब्रस्थान परिसर सुधारणा करणे व पाणी पुरवठा सोय करणे, पुनवर येथे कब्रस्थान वॉल कंपाऊंड बांधणे, गुळसडी येथे पीरसाहेब दर्गासमोर सभामंडप बांधणे, वाशिंबे येथे कब्रस्तान परिसर सुशोभिकरण करणे,

आवाटी येथे कब्रस्थान वॉल कंपाऊंड बांधणे व सुशोभिकरण करणे, दिवेगव्हाण येथे कब्रस्थान परिसर सुधारणा करणे व पाणी पुरवठा सोय करणे, कामोणे येथे पीर देवस्थान समोर सभामंडप बांधणे,जातेगांव येथे मेहबुब सुमाणी दर्गा (शब्बीर पठाण शेत) परिसरात सभामंडप बांधणे,कुडूवाडी (शहर) ता. माढा येथे नगरपालिकापाठीमागील कब्रस्थान वॉल कंपाऊंड बांधणे,कुडूवाडी (शहर) ता. माढा येथे टेंभुर्णी रोड लगत ईदगाह मैदान पेव्हिंग ब्लॉक बसविणे, उमरड येथे कब्रस्थान वॉल कंपाऊंड बांधणे व मदरसा परिसर सुशोभिकरण करणे, रावगाव येथे मस्जिद जवळील परिसर सुशोभिकरण करणे ही कामे केली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!