पोलीसगाडीस मोटरसायकलस्वराची पाठीमागून धडक- मोटारसायकलस्वार जखमी

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.24 : रात्रपाळीला गस्त घालणाऱ्या पोलीसगाडीस मोटारसायकल स्वाराने पाठीमागून येऊन धडक दिली आहे. यात मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे. हा अपघात जेऊर-करमाळा रस्त्यावर बिले पेट्रोलपंपाजवळ काल (ता.23) रात्री साडेदहा वाजता घडला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक कल्याण त्रिंबक फरतडे यांनी फिर्याद दिली आहे.त्यात त्यांनी म्हटले की ,मी दीड वर्षापासून करमाळा पोलीस ठाणे अंकित जेउर दुरक्षेत्र येथील सरकारी वाहन नं.एम एच 13 बी. क्यु 0084 यावर चालक म्हणून काम करीत आहे. दि.23/03/2023 रोजी 22/00 वा.ते दि. 24/03/2023 रोजीचे 05/00 या. चे दरम्यान रात्रगस्तीकरिता मला व सोबत होमगार्ड मोरे असे आम्हाला जेउर दुरक्षेत्र व हायवे पेट्रोलिंगकरिता नेमले होते.आम्ही दोघे मिळून दि.23/03/2023 रोजी 22/00 वा. चे सुमारास रात्रगस्तकरिता रवाना झालो होतो. आम्ही दोघे मिळून जेउर ते करमाळा हायवेवरती गस्त करीत असताना मी माझे ताब्यात असलेले वाहन 22/30 वा. सुमारास जेउर ते खडकेवाडी फाट्याच्या दरम्यान मौजे झरे गावच्या शिवारातील बिले सरांच्या भारत पेट्रोल पंपापासून अंदाजे 700 मी. अंतरावर आलो असता तेथे अचानकच मी चालवित असलेल्या सरकारी वाहन नं. एम एच 13 बी. क्यु 0084 यास पाठीमागुन एका अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली. त्यामुळे मी लागलीच माझे ताब्यातील चारचाकी वाहन बाजुला घेउन थांबविले आणि मी व माझे सोबत असलेले होमगार्ड मोरे असे मिळून सदर हिरो होंडा कंपनीची मोटारसायकल तिचा आर.टी.ओ पासिंग नंबर पाहिला असता एम. एच 45 एल 6320 असा असलेला दिसला. म्हणून आम्ही दोघांनी खाली पडलेल्या इसमास रोडवरून बाजुला घेउन त्यांच्या नाव विचारणा केली असता त्याने त्याचे नाव शिवाजी तुकाराम जाधव (वय-30) रा. चिखलठाण असल्याचे सांगितले. त्याने रस्त्याच्या विशिष्ट परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून माझे ताब्यातील सरकारी वाहनास त्याच्या ताब्यातील मोटारसायकलने पाठीमागुन जोराची धडक देउन स्वतः जखमी होण्यास तसेच शासकीय वाहनाचे पाठीमागील दरवाजा पायरी व त्याचे ताब्यातील मोटारसायकलचे नुकसान करण्यास कारणीभुत झाला आहे.
यातील मोटरसायकलस्वरास तात्काळ 108 क्रमांकाची रूग्णवाहिका बोलावून शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी मोटारसायकलस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.